अभियांत्रिकीचे विद्यार्थी पळवणार ‘फॉम्र्युला’ रेसिंग कार!

सुसाट वेगामुळे तरुणाईच्या लाडक्या ठरणाऱ्या ‘फॉम्र्युला’ प्रकारच्या रेसिंग कार तरुण स्वत:च बनवणार आहेत. इतकेच नव्हे तर स्वत:च रेसिंग ट्रॅकवर उतरून या गाडय़ा पळवणार देखील आहेत.

सुसाट वेगामुळे तरुणाईच्या लाडक्या ठरणाऱ्या ‘फॉम्र्युला’ प्रकारच्या रेसिंग कार तरुण स्वत:च बनवणार आहेत. इतकेच नव्हे तर स्वत:च रेसिंग ट्रॅकवर उतरून या गाडय़ा पळवणार देखील आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘सुप्रा एसएईइंडिया’ या रेसिंग कार बनवण्याच्या स्पर्धेची अंतिम फेरी १६ ते १९ जुलै दरम्यान चेन्नईत होणार असून पुण्यातल्या १९ महाविद्यालयांचे संघ या स्पर्धेत उतरणार आहेत.
या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून स्पर्धा वर्षभर तीन टप्प्यात होते. पहिल्या बाद फेरीच्या टप्प्यात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सांघिकरीत्या फॉम्र्युला प्रकारच्या रेसिंग कारची आभासी रचना (डिझाईन) बनवतात. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळत असून त्यातून ते प्रत्यक्ष रेसिंग कार तयार करतात. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले संघ त्यांनी बनवलेल्या रेसिंग कार रेसिंग ट्रॅकवर चालवून दाखवतात.
स्पर्धेचे निमंत्रक व टाटा मोटर्स विभागाच्या ‘होमोलोगेशन अँड प्रॉडक्ट इव्हॅल्युएशन’ विभागाचे प्रमुख प्रशांत बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेविषयी माहिती दिली. बॅनर्जी म्हणाले, ‘स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ‘फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब इन इंडिया’चे तज्ज्ञ तसेच वाहन उद्योगातील तज्ज्ञ उपस्थित राहणार असून ते सहभागी संघांच्या वाहनांचे परीक्षण करतील. रचना अहवाल, सादरीकरण, त्वरण, इंधन कार्यक्षमता, वजन, सहन क्षमता अशा विविध स्तरांवर कारचे मूल्यमापन केले जाईल.’ देशभरातून या स्पर्धेत देशातून ११० संघ सहभागी झाले असून यातील ५१ संघ महाराष्ट्र व पश्चिम भागातील आहेत व त्यातले १९ संघ पुण्याचे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Formula racing car

ताज्या बातम्या