scorecardresearch

राज्य हिंदी साहित्य अकादमीचे  डॉ. केशव फाळके यांचे निधन 

सुरुवातीच्या काळात मुंबईच्या शासकीय एलफिन्स्ट्न महाविद्यालयाच्या हिंदी विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

राज्य हिंदी साहित्य अकादमीचे  डॉ. केशव फाळके यांचे निधन 
डॉ. केशव फाळके

पुणे : राज्य हिंदी साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य आणि माजी सचिव डॉ. केशव फाळके (वय ८६) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

डॉ. फाळके यांचा जन्म १ जुलै १९३६ रोजी झाला. त्यांनी हिंदी भाषेत पीएच. डी. पदवी संपादन करण्याबरोबरच  भाषाशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या शासकीय एलफिन्स्ट्न महाविद्यालयाच्या हिंदी विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शासकीय संस्था आणि समितीवर त्यांनी काम केले. राज्याच्या उच्च शिक्षण विभागामध्ये संपर्क अधिकारी आणि विशेष कार्य अधिकारी तसेच राज्याच्या राजर्षी शाहू चरित्र साधन प्रकाशन समितीवर अशासकीय सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. हिंदी भाषेतील योगदानाबददल अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. त्यामध्ये केंद्र सरकारतर्फे हिंदी साहित्यकार पुरस्कार, उत्तर प्रदेशच्या हिंदी संस्थानचा सौहार्द सन्मान, मुंबईच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे हिंदी लेखक सन्मान, दिल्लीच्या गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेचा आचार्य काकासाहेब कालेलकर स्मृती सन्मान, केरळ हिंदी साहित्य अकादमीचा सन्मान आणि पानिपतच्या जैमिनी अकादमीचा महादेवी वर्मा सन्मान या पुरस्कारांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या