scorecardresearch

पुणे : येरवड्यात टोळक्याची दहशत; १२ वाहनांची तोडफोड

या प्रकरणी आदिसिंग आणि पाप्यासिंग या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे

arrest-7
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

येरवडा भागात टोळक्याने दहशत माजवून १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सिद्धेश शेंडगे, तेजस शेंडगे, करण अडागळे, मोईन शेख अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या प्रकरणी आदिसिंग आणि पाप्यासिंग या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा >>> पुणे: पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी चोरट्याचा मृत्यूचा बनाव; कोथरुडमधून मोटार चोरणारा मध्यप्रदेशातील चोरटा अटकेत

याबाबत  भरत वाजाणी (वय ४८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मध्यरात्री येरवडा भागातील सेवक चौकात आले. त्यांनी शिवीगाळ करून दहशत माजविली. रस्त्याच्या कडेला लावलेली विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन, रिक्षा, दुचाकी अशा १२ वाहनांची तोडफोड केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 20:48 IST