लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट मधून चार कोटी पकडले आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कागदपत्रे, वाहन परवाना नाही. त्यामुळं या घटनेचा अधिक तपास आयकर विभाग करत आहे. महेश नाना माने (चालक), विकास संभाजी घाडगे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच एक पथक तयार करण्यात आलं. सोमवारी सायंकाळी सहा च्या सुमारास KA-53-MB-8508 मारुती स्विफ्ट ही गाडी भरधाव पुण्याच्या दिशेने येत होती. पोलिसांनी हाथ केल्यानंतर गाडी थांबली नाही. तिचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून थांबवले. चालक महेश आणि विकासला ताब्यात घेण्यात आलं.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
students clashed again in pune university premises
पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गाडीतील प्रत्येक कोपरा तपासला, एका चोर कप्प्यात तब्बल चार कोटी रुपये पोलिसांना आढळले. या प्रकरणी दोघांकडे कागदपत्रे, वाहन परवाना मागितला. परंतु, दोघांकडे काही नव्हतं. अखेर दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील कारवाई करत आहेत. ही कारवाई लोणावळा ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.