पुणे : कंटेनरच्या धडकेत मोटारीतील चौघे जण जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा परिसरात शनिवारी घडली. अपघातात मोटारीतील साडेतीन वर्षांच्या बालिकेसह चौघेजण जखमी झाले. अपघातानंतर देगाव फाटा परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त कंटेनर आणि मोटार क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण…

हेही वाचा >>>शास्त्री रस्त्यावर तडीपार गुंडाला पकडले

सर्जेराव सखाराम पाटील (वय ६०), बायक्का सर्जेराव पाटील (वय ५०), प्रवीण सखाराम पाटील (वय ३५), इरा प्रवीण पाटील (वय साडेतीन, सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातात सर्जेराव पाटील, त्यांची पत्नी बायक्का गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली. पाटील कुटुंबीय मुंबईहून मोटारीतून कोल्हापूरला निघाले होते. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा परिसरात चेलाडी उड्डाणपुलाजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने मोटारीला धडक दिली.

हेही वाचा >>> सराफी पेढीतील सोनसाखळ्या गळ्यात घालून चोरट्यांनी ठोकली धूम; सिंहगड रस्ता भागात दोन घटना

कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाजवळ अडकला. अपघातात मोटारीतील चौघे जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर वरवे ते देगाव फाटा परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. या भागात तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेन मागविली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली.

Story img Loader