पुणे : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्राबरोबरच खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.पुरस्कारप्राप्त १४ शिक्षकांपैकी १० शिक्षक महापालिका शाळेतील, तर उर्वरित ४ शिक्षक खाजगी प्राथमिक शाळेतील आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ५९ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे आले होते. त्या प्रस्तावांतून गुणवंत शिक्षक निवडण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे आलेल्या प्रस्तावांमधून आदर्श शिक्षक निवडण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदर्श शिक्षक पुरस्कार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देवून गौरविण्यात येणार आहे. अंकुश माने (कात्रज), ज्ञानेश हंबीर (खराडी), नवनाथ भोसले (खराडी), रजनी गोडसे (वडगाव शेरी), हेमलता चव्हाण (कात्रज), विजय माने (हडपसर), राणी कुलकर्णी (कात्रज), चित्रा पेंढारकर (वारजे), स्मिता धारूरकर (हिंगणे खुर्द), वर्षा पंचभाई ( ढोले पाटील रोड) या दहा महापालिका शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुष्पा देशमाने, रोहिणी हमाडे, डॉ. प्रीती मानेकर आणि शुभदा शिरोडे या खासगी शाळेतील पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fourteen teachers decleared announcement adarsh teacher awards muncipal carporation of pune print news tmb 01
First published on: 07-10-2022 at 13:18 IST