scorecardresearch

Premium

गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दीड कोटींची फसवणूक

निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एक कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

fraud
सहा वर्षांपूर्वी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी कास फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एक कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Transfer of 40 people including police inspector in traffic cell in case of extortion in Shilpata
शिळफाटा येथील वसूलीप्रकरणी वाहतुक कक्षातील पोलीस निरीक्षकासह ४० जणांची बदली

आणखी वाचा-बाणेरमधील धक्कादायक घटना; बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून तरुणाची आत्महत्या

राजेश वसंतराव कारंडे (वय ७५), लिना राजेश कारंडे, अपर्णा निलेश कारंडे, लता वसंतराव कारांडे (सर्व रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी कास फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्याने वेळोवेळी आरोपींना एक कोटी ५५ लाख रुपये दिले. आरोपींनी त्यांना कंपनीतील समभागांचे प्रमाणपत्र दिले होते. आरोपींनी करारनामा केला. आरोपींनी कराराचा भंग करुन पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जानकर तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud of 1 5 crore with retired police officer by giving lure of investment pune print news rbk 25 mrj

First published on: 12-09-2023 at 15:35 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×