scorecardresearch

Premium

पुणे : साखर, मीठ, तेलाचे डबे खरेदी करून पावणेपाच कोटींची फसवणूक

मार्केट यार्डातील भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या भुसार मालाचे पैसे न देता चार कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

man cheated director of educational institution by claiming officer in cm office
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या भुसार मालाचे पैसे न देता चार कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शमीत शशिकांत बंब (वय ३५, रा. मार्केट यार्ड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याची भुसार बाजारात पेढी आहे.

बंब याने व्यापाऱ्याकडून साखर, मीठ, तेल डबे असा माल खरेदी केला होता. बंब याने भुसार व्यापाऱ्याला रोख, ऑनलाइन स्वरुपात रक्कम दिली होती. उर्वरित चार कोटी ४२ लाख पाच हजार ५७८ रुपये दिले नव्हते. भुसार व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाची विक्री अन्य व्यापाऱ्यांना करुन बंब याने रक्कम परत केली नाही. भुसार व्यापाऱ्याने रक्कम परत करण्याबाबत बंबकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी बंबविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 11:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×