पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये डेंटिस्ट असलेल्या डॉक्टरला मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्याने संचालकपदी निवडण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातलाय. इतर साथीदारांच्या मदतीने तब्बल या अधिकाऱ्याने या दातांच्या डॉक्टरकडून १ कोटी ६ लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डॉ. आदित्य दगडू पतकराव (वय-३६) यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

डॉ. आदित्य यांना सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी निवडण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि त्यातूनच फसवणूक केली. या प्रकरणी विकास शिंदे, राजाराम शिर्के (कक्ष अधिकारी मंत्रालय, मुंबई), श्रेया चौहान, अजित दुबे अशा ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदित्य दगडू पतकरराव हे डेंटिस्ट आहेत. त्यांचं सांगवी परिसरात रुग्णालय आहे. डॉ. आदित्य यांची काही वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीमार्फत आरोपी राजाराम शिर्के याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर शिर्के यांनी डॉक्टरांशी फेसबुक इतर सोशल मीडियावर ओळख वाढवली. आरोपी शिर्के आणि डॉ. आदित्य यांच्यात अनेकदा फोनवरून संभाषण झाले. याशिवाय प्रत्यक्षात देखील अनेक वेळा भेट झाली.

भारत सरकारच्या राजमुद्रेचा गैरवापर

यानंतर राजाराम शिर्के यांनी डॉ. पतकराव यांना सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याचं संचालकपद तुम्हाला देऊ असं आमिष दाखवलं. मात्र, त्यासाठी पैसे द्यावे लागतील अशी अट घातली. डॉ. आदित्य यांनी होकार देत त्यांना तब्बल १ कोटी ६ लाख रुपये दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा : NRI चं बँक खातं निष्क्रिय पाहून लुटीचा ‘प्लॅन’, HDFC च्या ३ कर्मचाऱ्यांसह १२ जणांना अटक, वाचा नेमकं काय घडलं?

आरोपींवर भारत सरकारची मुद्रा चुकीच्या आणि बनावट पद्धतीने वापरल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.