तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून एकाला चोरट्यांनी १८ लाख ३७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकाने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार एका खासगी कंपनीत अधिकारी आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर रिना नावाच्या एका महिलेने संपर्क साधला. एका संकेस्थळाच्या माध्यमातून उच्चभ्रू तरुणींशी मैत्री करुन दिली जाते. त्यासाठी नावनोंदणी करावी लागेल, अशी बतावणी रिना नावाच्या महिलेने त्यांच्याकडे केली. रिनाने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही तरुणींची छायाचित्रे पाठविली. त्यानंतर तक्रारदार आमिषाला बळी पडले.

goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

तक्रारदाराकडे वेळोवेळी बतावणी करुन त्यांच्याकडून १८ लाख ३७ हजार ६०० रुपये उकळण्यात आले. तक्रारदाराने रिना नाव सांगणाऱ्या महिलेकडे विचारणा केली. तेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे फिर्याद दिली. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन तक्रारदाराशी संपर्क साधून आमिष दाखविण्या आल्याचे उघडकीस आले असून गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.