बांधकाम व्यावसायिकावर ‘मोफा’ कायद्यानुसार गुन्हा

पुणे : सदनिका खरेदी व्यवहारात पोलीस हवालदाराची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदनिकेचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे तसेच सोसायटी स्थापन न करता कोणत्याही प्रकारच्या सुविधा न दिल्याने भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  याप्रकरणी विनायक डेव्हलपर्सचे विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार दिनकर बबन हनमघर (वय ४५, रा. विनायक रेसीडन्सी, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनायक डेव्हलपर्सकडून दत्तनगरमध्ये विनायक रेसिडन्सी गृहप्रकल्प बांधण्यात आला. या गृहप्रकल्पातील सदनिका हनमघर यांना पसंत पडली. हनमघर पोलीस दलात हवालदार आहेत. एक वर्षांच्या आत ताबा मिळेल, असे हनमघर यांना सांगण्यात आले होते. तसेच लिफ्ट, वीजजोड, ये-जा करण्यासाठी रस्ता अशा सुविधा देण्याचे आश्वासन हनमघर यांना देण्यात आले होते.  सदनिकेची किंमत साडेचौदा लाख रुपये निश्चित करण्यात आली होती.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

हनमघर यांनी नऊ लाख ४० हजार रुपये दिले. सदनिका तसेच इमारतीचे काम नित्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर हनमधर यांनी बांधकाम व्यावसायिक शिरोळेंकडे विचारणा केली तेव्हा त्यांना आणखी चार लाख ७०  हजार रुपये खर्च करण्यास सांगण्यात आले.  त्यानंतर हनमधर यांनी काम करून घेतले. लिफ्ट, रंग, वीजजोड, ये-जा करण्यासाठी रस्ता अशा सुविधा देण्यात आल्या नाहीत. बरीच कामे अपूर्ण ठेवण्यात आली. पालिकेच्या मान्य नकाशाप्रमाणे बांधकाम करण्यात आले नाही, गृहरचना संस्थेची स्थापनाही करण्यात आली नाही, अशी फिर्याद हनमघर यांनी दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक शिरोळे यांच्या विरोधात अपहार तसेच महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्यान्वये (मोफा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.