scorecardresearch

Premium

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर नोकरीच्या आमिषाने चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

job fraud
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक ( प्रातिनिधिक छायाचित्र )

पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर नोकरीच्या आमिषाने चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी होते. निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मोबाइल वर्क इन इंडिया नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरीची संधी असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास सांगितले. तक्रारदाराकडे बतावणी करुन चोरट्यांनी वेळोवेळी दोन लाख ९८ हजार ७०० रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक ढवळे तपास करत आहेत.

Chandrakat Patil on runway
चंद्रकांतदादांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीकडे! आढावा बैठक घेत दिल्या सूचना
Bodhi Tree Planting Festival
नाशिक : बोधी वृक्षारोपण महोत्सवात दलाई लामांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग, सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश
bomb at mumbai airport, mumbai police received threat call, bomb in blue bag, blue bag at mumbai airport
मुंबई विमानतळावर बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी
canada pm justin trudeau narendra modi jody thomas ajit doval
मोठी अपडेट! कॅनडाच्या सुरक्षा सल्लागार महिन्याभरात दोन वेळा भारतात येऊन गेल्या; अजित डोवाल यांच्याशीही चर्चा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud with the lure of getting a job at an international airport pune print news rbk 25 amy

First published on: 29-08-2023 at 09:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×