scorecardresearch

पुणे महापालिकेच्या रुग्णालयांत विनामूल्य गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

महापालिकेच्या दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभागामध्ये आठवड्यातून दोन वेळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकदा लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे.

पुणे महापालिकेच्या रुग्णालयांत विनामूल्य गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण
संग्रहित छायाचित्र

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोवर आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यामध्ये गोवर रुबेला लस विनामूल्य दिली जाणार आहे. नऊ महिने ते बारा महिन्याच्या बालकांना पहिली मात्र तर सोळा ते चोवीस महिन्यांच्या बालकांना रुबेला लशीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

हेही वाचा- पुणे: ‘संविधान अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे’; संविधान दौडच्या उद्धाटनप्रसंगी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले मत

राज्यात भिवंडी, मुंबई आणि मालेगांव येथे गोवर आजाराची साथ आढळून आली आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. बालकांना ताप, सर्दी, खोकला, घशात दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, लाल रंगाचे पुरळ येणे, डोळे लाल होणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

हेही वाचा- पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या माहितीसाठी संकेतस्थळ विकसित

गोवर रोखण्यासाठी त्वरित गोवर रुबेला लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रसूतिगृहात सध्या बालकांचे नियमित लसीकरण केले जात आहे. महापालिकेच्या दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभागामध्ये आठवड्यातून दोन वेळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकदा लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे बांधकामांच्या ठिकाणी, जोखीमग्रस्त आणि अतिजोखीमग्रस्त ठिकाणी आणि रस्त्यांवरील बालकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनाथाश्रम, धार्मिक ठिकाणांमध्ये किती बालके आहेत, याची माहिती सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घेऊन या ठिकाणी लसीकरण वाढविण्याला आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. तसेच आता महापालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयातही विनामूल्य लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 16:00 IST

संबंधित बातम्या