डोंबिवलीच्या कौशिक लेलेचा मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी उपक्रम; भाषा संवर्धन पंधरवडा विशेष

पुणे : करोना काळात ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य झाले असले, तरी कौशिक लेले करोनापूर्वीपासूनच मराठी भाषेचे ऑनलाइन धडे देत आहे. परदेशी नागरिक, नोकरी-शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या परराज्यातील तरुणांना कौशिक मोफत मराठी शिकवण्याचे काम सातत्याने करत असून, भाषा शिक्षणासाठीच्या त्याच्या युट्यूब वाहिनीने दहा हजारांहून अधिक सदस्यसंख्येचा टप्पाही गाठला आहे. मूळचा डोंबिवलीचा असलेला कौशिक लेले पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो.  गेली काही वर्षे तो मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे. परदेशी भाषा शिकण्यासाठी त्या भाषांच्या स्वतंत्र खासगी शिकवण्या असतात. मात्र भारतीय भाषा शिकण्यासाठी अपवादानेच शिकवणी वर्ग दिसतात या विचारातून कौशिकने मराठी आणि गुजराती भाषा शिकवण्यास सुरुवात केली. आपले संकेतस्थळ विकसित करून त्याने मराठी आणि गुजराती भाषा स्वअध्ययनाद्वारे शिकण्यासाठीचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. त्यात लिपी, वाक्यरचना, दैनंदिन संभाषण आदी मुलभूत माहितीचा समावेश आहे. आता त्या पलीकडे जाऊन तो ऑनलाइन पद्धतीने वर्गही घेतो. विशेष म्हणजे, त्याचा हा संपूर्ण उपक्रम विनामूल्य आहे.

idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार

मराठी भाषा ऑनलाइन शिकवण्याविषयी कौशिक म्हणाला, की अमेरिका, जपान, कोस्टारिका, जर्मनी, इंडोनेशिया, युरोप अशा देशातील नागरिक गेल्या तीन-चार वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने मराठी शिकत आहेत. संकेतस्थळावरून माहिती मिळाल्यावर त्यांना अधिक मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन ऑनलाइन सराव सत्रे सुरू केली. मला स्वत:ला आवडते म्हणून म्हणून नोकरी सांभाळून ही हा उपक्रम करतो. भाषा, महाराष्ट्रीय संस्कृतीच्या कुतुहलातून परदेशी नागरिक मराठी शिकतात. तर महाराष्ट्रात नोकरी, शिक्षणासाठी येण्याच्या दृष्टीने परराज्यातील तरुण मराठी शिकतात. करोना काळात ऑनलाइन शिक्षण महत्त्वाचे झाले आहे. मात्र मी त्या पूर्वीपासूनच ऑनलाइन पद्धतीने मराठी शिकवत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत युट्यूब वाहिनीची सदस्य संख्याही १० हजारांच्या पुढे गेली आहे, असेही कौशिकनेने सांगितले.