डोंबिवलीच्या कौशिक लेलेचा मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी उपक्रम; भाषा संवर्धन पंधरवडा विशेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : करोना काळात ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य झाले असले, तरी कौशिक लेले करोनापूर्वीपासूनच मराठी भाषेचे ऑनलाइन धडे देत आहे. परदेशी नागरिक, नोकरी-शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या परराज्यातील तरुणांना कौशिक मोफत मराठी शिकवण्याचे काम सातत्याने करत असून, भाषा शिक्षणासाठीच्या त्याच्या युट्यूब वाहिनीने दहा हजारांहून अधिक सदस्यसंख्येचा टप्पाही गाठला आहे. मूळचा डोंबिवलीचा असलेला कौशिक लेले पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो.  गेली काही वर्षे तो मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे. परदेशी भाषा शिकण्यासाठी त्या भाषांच्या स्वतंत्र खासगी शिकवण्या असतात. मात्र भारतीय भाषा शिकण्यासाठी अपवादानेच शिकवणी वर्ग दिसतात या विचारातून कौशिकने मराठी आणि गुजराती भाषा शिकवण्यास सुरुवात केली. आपले संकेतस्थळ विकसित करून त्याने मराठी आणि गुजराती भाषा स्वअध्ययनाद्वारे शिकण्यासाठीचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. त्यात लिपी, वाक्यरचना, दैनंदिन संभाषण आदी मुलभूत माहितीचा समावेश आहे. आता त्या पलीकडे जाऊन तो ऑनलाइन पद्धतीने वर्गही घेतो. विशेष म्हणजे, त्याचा हा संपूर्ण उपक्रम विनामूल्य आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free online marathi lessons foreigners ysh
First published on: 21-01-2022 at 00:02 IST