पिंपरी : धर्मांतरावर आधारित ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. सिनेमागृहात गुरुवारी, दि. ११ मे रोजी ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शोचे नियोजन केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते सुदिप्तो सेन असून, चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह आहेत, यांनी दाखवलेली हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांना चिंतन करायला लावणारी आहे. सर्व धर्मातील निरपराध महिलांना कधी प्रेमाने, तर कधी धमक्या देऊन कसे इस्लाम धर्मात धर्मांतरित केले जाते हे दाखवले आहे. यासाठी समाजप्रबोधनाचा भाग म्हणून आमदार लांडगे यांनी या चित्रपटाचे तीन शो मोफत आयोजित केले आहेत.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

हेही वाचा – पिंपरी : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने अभियंता तरुणीची २४ लाखांची फसवणूक

आमदार लांडगे म्हणाले की, धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना समाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता-भगिनी अशा कुप्रवृत्तीपासून दूर रहाव्यात, अशी आमची भावना आहे. राज्य सरकारने धर्मांतर, लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही आम्ही विधानसभा अधिवेशनात केली होती.

हेही वाचा – पुणे : मावळ पवना धरणग्रस्तांचा मोर्चा; पिंपरी-चिंचवडचे पाणी केले बंद!

“लव्ह जिहाद आणि धर्मांतर यात लग्नाचे आमीष, प्रेमाचे आमीष किंवा नोकरीचे आमीष दाखवून मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर अत्याचार केले जातात. ही बाब समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मध्यतंरी लव्ह जिहाद आणि धर्मांतर, गोहत्याबंदीबाबत शहरात विराट मोर्चा काढण्यात आला होता. आळंदीत एक धर्मांतराचा प्रकार आम्ही उधळून लावला होता. आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून आम्ही हा शो मोफत ठेवला आहे.” अशी माहिती महेश लांडगे यांनी दिली