डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्यातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महिने कालावधीचे ‘सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी’चे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण २६ डिसेंबरपासून सुरू होईल.

हेही वाचा- पुणे : राज्यात बोचऱ्या थंडीची प्रतीक्षाच; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…

हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी उमेदवाराने संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन पदवी किंवा समतुल्य संगणक शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात संबंधित विषयाची तांत्रिक माहिती, उद्योजकता विकासाचा अभ्यासक्रम, उद्योग सुरु करण्याबाबतची माहिती, कर्ज प्रकरण, शासकीय अनुदान, प्रकल्प अहवाल, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ आदींबाबतची माहिती दिली जाईल. प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी २४ डिसेंबरपर्यंत ९८२२०६८१६५ किंवा ९४०३०७८७६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी मदन कुमार शेळके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.