scorecardresearch

पुणे: कात्रजमध्ये आर्थिक वादातून मित्राचा खून

पुणे शहरामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या रॅपिडोच्या दुचाकी टॅक्सी सेवेला उच्च न्यायालयाने ‘ब्रेक’ लावला आहे.

पुणे: कात्रजमध्ये आर्थिक वादातून मित्राचा खून
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

आर्थिक वादातून मित्राच्या डोक्यात गज घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.राहुल बबन दांगट (वय ४६, रा. शिलाई वर्ल्ड दुकानासमोर, आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुशांत नारायण आरुडे (वय ३०, रा. चिंतमणी अपार्टमेंट, फालेेनगर, आंबेगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली. राहुल याचा भाऊ विकास दांगट (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल आणि सुशांत मित्र आहेत. राहुल आणि सुशांत यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाला होता.

हेही वाचा >>>कोरेगाव पार्क भागात गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या विरोधात ‘मोक्का’

दोघांच्या आर्थिक व्यवहारांबाबत विकास दांगट यांना माहिती होती. शुक्रवारी पहाटे दोघांमध्ये वाद झाला. सुशांतने राहुलच्या डोक्यात गज मारला. त्यानंतर त्याचा दोरीने आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारांपूर्वीच राहुलचा मृत्यू झाला होता. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सुशांतला पोलिसांनी पकडले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गंगाधर घावटे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या