scorecardresearch

सिगारेट च्या वादावरून १५ वर्षीय मुलाचा मित्रांनी केला खून ; खुना प्रकरणी ५-६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले

पिंपरी-चिंचवडमध्ये सिगारेट देण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मित्राचा मित्रांनी खून केला आहे.

crime
(सांकेतिक फोटो)

पिंपरी-चिंचवडमध्ये सिगारेट देण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मित्राचा मित्रांनी खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून झालेला मुलगा अल्पवयीन असून मारेकरी देखील अल्पवयीन आहेत. त्यामुळं शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

मयत अशोक (नाव बदलल आहे) तो आणि त्याचे मित्र कबुतराची ढाबळ (पिंजरा) इतर काही मुलं तोडणार असल्याने त्यांना दमबाजी करण्यासाठी एकत्रित आले होते, सोबत कोयता देखील होता. परंतु, समोरील गट न आल्याने अशोक चा आणि त्यांच्या मित्राचा सिगारेटवरून वाद झाला त्यात अशोक ला जीव गमवावा लागला आहे. 

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक आणि त्यांच्या मित्रांकडे कबुतर, पिंजरा आहे ते इतर गटातील मुलं घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. तस विरोधी गटातील मुलं येणार असल्याची माहिती देखील इंस्टाग्रामवरून अशोक च्या गटाला दिली. मोशीतील टोलनाका येथे निर्जनस्थळी ते भेटायला येणार असल्याने त्यांना दमबाजी करायची या उद्देशाने सोबत कोयता घेतला. मात्र समोरील गट आलाच नाही हे बघून अशोक ची आणि त्याच्या गटातील मुलांची दारू पार्टी झाली. अशोककडे अल्पवयीन मित्रांनी सिगारेट मागितलं त्यावरून त्यांच्यात भांडण झालं. काही क्षणाचा विचार न करता अशोक च्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले. गंभीर म्हणजे यातील बहुतांश सर्वांनीच एकापाठोपाठ वार केलं असल्याची पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी 5 – 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी MIDC पोलीस करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Friends kill 15 year old boy over cigarette dispute 5 6 minors were arrested in the murder case amy