scorecardresearch

फेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

फेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
(file photo indian express)

फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसात प्रेयसीने प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, प्रेयसी प्रियकराच्या घरी गेल्यानंतर तो विवाहित असल्याचं देखील समोर आलं. तसेच प्रियकराच्या पत्नीने पीडितेला चप्पल कानशिलात लगावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाची आणि तरुणीची फेसबुकवर ओळख झाली. त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आपण लग्न करू अस आरोपी म्हणायचा, लग्नाच्या आणाभाका खात ते एकमेकांना भेटायचे. दरम्यान, तरुणीशी आरोपी हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याने स्वतः चा विवाह झाल्याच देखील पीडित तरुणीपासून लपवून ठेवले. एकेदिवशी चाकण येथे आरोपीने तरुणींशी लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला. त्यानंतर, काही महिन्यांनी देहूगाव येथील रिसॉर्टवर नेऊन पुन्हा जबरदस्ती करत बलात्कार केला अस तक्रारीत म्हटलं आहे. 

लग्नाच्या आणाभाका खात असल्याने तरुणीने आरोपीला आपण लग्न करू अस म्हटलं. मात्र, त्यानंतर आरोपीने तरुणींशी असलेला संपर्क तोडला. तेव्हा, पीडित तरुणीने थेट प्रियकराचे घर गाठले. त्यावेळी प्रियकराचा विवाह झाल्याचे समोर आले. पीडित तरुणी आणि प्रियकराच्या पत्नीमध्ये भांडण झालं यातूनच प्रियकराच्या पत्नीने पीडितेच्या कानशिलात चप्पल मारली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च २०२० पासून ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान घडली आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या