पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त | Fund of 3 18 lakhs received for heavy rain victims pune print news amy 95 | Loksatta

पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त

चालू वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपीक, फळपिकांचे नुकसान झाले आहे.

पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त
संग्रहित छायाचित्र

चालू वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपीक, फळपिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ९१९२ शेतकऱ्यांच्या २२४७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन कोटी १८ लाख रुपये, शेतजमीन नुकसानीसाठी १५ लाख रुपये, मृत जनावरांसाठी ७४ लाख रुपये, पूर्णतः नष्ट, पडझड, कच्ची-पक्की घरे, झोपड्या आणि गोठ्यांसाठी एक कोटी २० लाख रुपये अशा एकूण पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण स्थानिक पातळीवर केले जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : दहीहंडी उत्सवात गोळीबार ; गुंड टोळीवर मोक्का कारवाई

२९ कोटी ५२ लाख ४७ हजार १५ रुपयांचा निधी लाल फितीत अडकला
अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर अशा विविध कारणांनी नुकसान झालेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील बाधित नागिरकांना नुकसानीपोटी द्यायचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्तच झालेले नाही. गेल्या तीन वर्षांपासूनचा तब्बल २९ कोटी ५२ लाख ४७ हजार १५ रुपयांचा निधी लाल फितीत अडकला आहे. या अडकलेल्या निधीमध्ये सन २०१९ मध्ये २५ सप्टेंबर रोजी शहरात झालेला ढगफुटीसदृश पावसामुळे झालेले नुकसान भरपाई, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये शेतीपिक नुकसान, तौक्ते चक्रीवादळ, ऑक्टोबर २०२१ मधील अतिवृष्टी आणि डिसेंबर २०२१ मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. या सर्व नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडे वेळोवेळी अहवाल पाठविण्यात आले. मात्र, त्यातील काही निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस आंबेगाव येथे दरीत कोसळली, ४ विद्यार्थी जखमी

संबंधित बातम्या

पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
“देवांचा बाप असल्याचा साक्षात्कार त्यांना…”; ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं
पुणे : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : गुजरातमध्ये भाजपासाठी केलेलं ‘ते’ भाषण भोवलं! परेश रावल यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं घडलं काय
“…तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन पर्यटन करत होते”; सीमाप्रश्नावरून बाळासाहेब थोरातांची शिंदे सरकारवर टीका
Suresh Raina Video: लॉर्डसच्या ग्राऊंडवरुन थेट गल्लीच्या मैदानावर; सुरेश रैनाचा साधेपणा चाहत्यांनाही भावला
भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवा ,‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना
Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?