ग. प्र. प्रधान यांच्या साहित्याचे जन्मशताब्दी वर्षात पुनर्प्रकाशन

मूळ पुस्तकाला अखिल भारतीय काँग्रेसने घेतलेल्या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते.

पुणे : साक्षेपी लेखक आणि विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांचे मराठी आणि इंग्रजी साहित्य बऱ्याच वर्षांनी पुन्हा वाचकांपुढे येणार आहे. प्रधान यांच्या गुरुवारपासून (२६ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साधना प्रकाशनातर्फे

त्यांचे साहित्य पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे.

लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९५६ मध्ये ग. प्र. प्रधान आणि प्र. के. भागवत यांनी सर्वभाषिक भारतीय वाचक डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या लोकमान्य टिळक चरित्राचे अवधूत डोंगरे यांनी केलेले मराठी भाषांतर लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या सांगतेला १ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाले. ६५ वर्षांनी हे पुस्तक

मराठीमध्ये उपलब्ध झाले आहे. मूळ पुस्तकाला अखिल भारतीय काँग्रेसने घेतलेल्या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते. तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली होती. या आठवड्याचा साधनेचा अंक प्रधान मास्तरांना समर्पित करण्यात आला आहे.

१८५७ ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामावर आधारित ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ हे पुस्तक २० वर्षांनी, ‘माझी वाटचाल’ हे आत्मपर पुस्तक गुरुवारी जन्मशताब्दीच्या निमित्तानेप्रकाशित होणार असल्याची माहिती साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली.

१९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लिहिलेल्या अनुक्रमे ‘हाजिपीर’ आणि ‘सोनार बांगला’ या दोन रिपोर्ताज पुस्तकांचे प्रकाशन बांगलादेश निर्मितीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त दिवाळीदरम्यान, भाकरी आणि स्वातंत्र्य, असंग्रहित लेखन संकलन, साधनेचे १४ वर्षे लिहिलेल्या संपादकीयातील निवडक अग्रलेख, इंग्रजी लेखांचे संकलन आदी पुस्तकांचे वर्षभरात प्रकाशन होईल. त्याशिवाय ‘साता उत्तराची कहाणी’ या प्रधान मास्तरांच्या महत्त्वाच्या पुस्तकावर दिवसभराचे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचेही शिरसाठ यांनी सांगितले.

आज परिसंवादाचे आयोजन

महाराष्ट्र साहित्य परिषद, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यातर्फे  ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘प्रा. ग. प्र. प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण’ या विषयावर श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी दहा वाजता परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कु लपती डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित राहणार आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: G p pradhan marathi and english literature akp

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले