पुणे :डाॅ. मोहन आगाशे यांना 'गदिमा पुरस्कार' जाहीर; साधना बहुळकर यांना 'गृहिणी सखी सचिव पुरस्कार' | Gadima Award announced to Dr Mohan Agashe pune print news amy 95 | Loksatta

पुणे :डाॅ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर; साधना बहुळकर यांना ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे :डाॅ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर; साधना बहुळकर यांना ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’
डाॅ. मोहन आगाशे यांना 'गदिमा पुरस्कार' जाहीर

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे चैत्रबन पुरस्काराचे तर, युवा गायिका योगिता गोडबोले या विद्या प्रज्ञा पुरस्काराच्या मानकरी आहेत.

हेही वाचा >>>पुणे: शिवाजीनगर न्यायालयातील लाचखोर लिपिकाला पकडले

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार आणि समीक्षक सुरेश खरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गदिमांचे ज्येष्ठ पुत्र श्रीधर माडगूळकर यांच्या पत्नी शीतल माडगूळकर यांनी लिहिलेल्या आठवणींवर आधारित ‘गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे. उत्तरार्धात गदिमांचे बंधी डाॅ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ ‘गदिमा आणि लता’ हा गदिमा गीतांचा कार्यक्रम महक संस्थेच्या मनीषा निश्चल आणि सहकारी सादर करणार आहेत, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:27 IST
Next Story
पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप