scorecardresearch

पुणे : गजा मारणे टोळीच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी खंडणीची मागणी; एक जण अटकेत

अनधिकृत बांधकामाची तक्रार महापालिकेकडे करुन कारवाईची भीती आरोपी राकेश मारणेने बांधकाम व्यावसायिकाला दाखविली हाेती.

पुणे : गजा मारणे टोळीच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी खंडणीची मागणी; एक जण अटकेत
गुंड गजानन उर्फ गजा मारणे

गुंड गजानन उर्फ गजा मारणे टोळीच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. राकेश विठ्ठल मारणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून सॅलसबरी पार्क परिसरात बांधण्यात येत असलेल्या नियोजित गृहप्रकल्पातील चार मजले अनधिकृत आहेत. अनधिकृत बांधकामाची तक्रार महापालिकेकडे करुन कारवाईची भीती आरोपी राकेश मारणेने बांधकाम व्यावसायिकाला दाखविली हाेती.

हेही वाचा >>> पुणे : कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार; टोळक्याचा सराईत गुंडावर हल्ला

कारवाई झाल्यास वीस कोटी रुपयांचे नुकसान होईल. गजा मारणे टोळीची भीती दाखवून आरोपी मारणे याने बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मारणे याने एका राजकीय पक्षाचा तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची बतावणी बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती. त्याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 23:03 IST

संबंधित बातम्या