पुणे शहरातील गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुक तब्बल २९ तास चालली.मात्र या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीनी अधिक वेळ घेतला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली.यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले की,करोनानंतर तब्बल दोन वर्षानी गणेशोत्सव असल्याने आगमन आणि विसर्जन मिरवणुक पाहण्यास नागरिक मोठ्या संख्येने येणार ही शक्यता होती. त्यानुसार ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या संपूर्ण गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही भागात अनुचित घटना घडू नये.यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच शहरात ३ हजार ६०० मंडळ असून त्यातील जवळपास ३ हजार मंडळांनी शुक्रवारी विसर्जन केले आहे. त्या दरम्यान अनेक मंडळांनी ध्वनी प्रदूषणाची पातळी क्रॉस केली असून त्याबाबत आम्ही नोंद ठेवली आहे.ती तपासून कारवाई केली जाणार आहे.तर डिजे आवाजाने मृत्यू झाल्याचे सोशल मीडियावरील मेसेज चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील आठ ते नऊ वर्षातील विसर्जन मिरवणुकी करिता २८ तास कधी तर कधी २८ तास ५०मिनिट लागले आहेत.तर यंदा ही मिरवणुक २९ चालली आहे.मात्र या मिरवणुकी दरम्यान मानाच्या गणपती ना काही वेळ लागला.मात्र त्यानंतरच्या गणपती मंडळींनी वेळ घेतला नाही.तसेच विसर्जन मिरवणुक पाहण्यास येणार्‍या अनेक नागरिकांचे मोबाईल किंवा सोन्याची दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत.त्याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.