पुण्यात लाडक्या गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी

श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत

पुणे येथील बाजारपेठेतून गणेश मूर्ती घेऊन जाताना एक कुटुंब. छायाचित्र: तन्मय ठोंबरे

आपल्या लाडक्या श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी भाविक आतूर झाले आहेत. पुण्यातील बाजारपेठा भाविकांनी फुलून गेल्या असून घरगुती गणेशाची मूर्ती घेण्यासाठी शनिवार वाडा परिसर, कुंभार वाडा, मंडई परिसरात गर्दी झाली आहे. आज श्री गणेशाची मूर्ती नेऊन उद्या सकाळी त्याची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना बालगोपाळांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

 

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्यानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने सणस मैदानावर शाडू मातीच्या मूर्ती साकारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात ११६ शाळांतील तब्बल ३ हजार ८२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याच वर्षी वर्षी हाँककाँग येथे एकाच वेळी १०८२ मूर्ती साकारण्याचा विक्रम प्रस्थापित झाला होता. त्यानंतर आज पुण्यात ३०८२ विद्यार्थ्यांनी १ तास ३१ मिनिटांत प्रत्येकी एक मूर्ती साकारत विद्यार्थ्यांनी एकूण ३०८२ शाडूच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. छायाचित्रातून या उपक्रमावर टाकूयात एक नजर.. सर्व छायाचित्रे: तन्मय ठोंबरे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh chaturthi 2017 pune welcome of lord ganesh

ताज्या बातम्या