पुणे : काडीपेटी न दिल्याने मद्यालयातील सुरक्षारक्षकासह रोखपालाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. टोळक्याने मद्यालयातील रोखपालाच्या डोक्यात बाटली फोडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रफुल्ल रणसिंग, रणजीत उर्फ पितांबर घोडके (वय २५), कृष्णा सपकाळ (वय २६), गजानन असलकर (वय २६) अशी गु्न्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अरविंद लज्जाराम यादव (वय १९, रा. मधुशाला बारजवळ, चैतन्यनगर, सातारा रस्ता, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यादव हे सातारा रस्त्यावरील मधुशाला बारमध्ये सुरक्षारक्षक आहे. रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बार बंद करण्यात आला. त्यावेळी आरोपी रणसिंग बारमध्ये पाठीमागील बाजूच्या दरवाज्याने आला. त्याने बारमधील रोखपाल लेलिन यांना काडीपेटी मागितली. काडीपेटी दिल्यानंतर रणसिंगला बारमधून बाहेर जाण्यास सांगितले. हेही वाचा.शहरबात… पिंपरी : खड्डेमय उद्योगनगरीची ‘रस्तामुक्त’ फरफट! ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे’ बाहेर जाण्यास सांगितल्याने रणसिंग चिडला. त्याने साथीदार घोडके, सपकाळ, असलकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी बिअरची बाटली लेलिन यांच्या डोक्यात फोडली. त्यांना खुर्ची फेकून मारली. त्यावेळी सुरक्षारक्षक यादव याने मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी यादवला मारहाण केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पोठरे तपास करत आहेत.