लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांच्या टाेळीला हडपसर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून १६ लाख रुपयांचे ५२ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शामकुमार संजय राम (वय २५), विशालकुमार गंगा महातो (वय २१), बालदत्तकुमार मोतीलाल महातो (वय २५), विकीकुमार गंगा महातो उर्फ बादशाह नोनीया (वय १९, चौघे रा. साहेबगंज, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या मोबाइल चोरट्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार गोपी महातो, राहुल महातो पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल चोरीसाठी झारखंडमधील चोरटे आले असून, ते हडपसर भागात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजित मदने, कुंडलिक केसकर यांना मिळाली. पोलिसांनी उन्नतीनगर परिसरात सापळा लावून चोरट्यांना पकडले.

हेही वाचा… यंदा गणेश विसर्जनाला मुठा नदी कोरडी, खडकवासला धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल चोरण्यासाठी पुण्यात आल्याची कबुली चोरट्यांनी दिली. चोरट्यांकडून ५२ मोबाइल संच जप्त करण्यात आले. चोरट्यांनी मध्यभागातील महात्मा फुले मंडई, येरवडा भाजी मंडई परिसरातून मोबाइल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा… ‘सायन्स काँग्रेस’मधून केंद्र सरकार बाहेर; पुढील वर्षी होणाऱ्या संमेलनाला सहकार्यास नकार 

हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे चोरट्यांनी केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader