Premium

पुणे: गणेशोत्सवात मोबाइल चोरणारी झारखंडमधील टोळी गजाआड; ५२ मोबाइल जप्त

चोरट्यांनी मध्यभागातील महात्मा फुले मंडई, येरवडा भाजी मंडई परिसरातून मोबाइल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

gang Jharkhand stole mobile phones Ganeshotsav arrested
गणेशोत्सवात मोबाइल चोरणारी झारखंडमधील टोळी गजाआड; ५२ मोबाइल जप्त (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांच्या टाेळीला हडपसर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून १६ लाख रुपयांचे ५२ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

शामकुमार संजय राम (वय २५), विशालकुमार गंगा महातो (वय २१), बालदत्तकुमार मोतीलाल महातो (वय २५), विकीकुमार गंगा महातो उर्फ बादशाह नोनीया (वय १९, चौघे रा. साहेबगंज, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या मोबाइल चोरट्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार गोपी महातो, राहुल महातो पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल चोरीसाठी झारखंडमधील चोरटे आले असून, ते हडपसर भागात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजित मदने, कुंडलिक केसकर यांना मिळाली. पोलिसांनी उन्नतीनगर परिसरात सापळा लावून चोरट्यांना पकडले.

हेही वाचा… यंदा गणेश विसर्जनाला मुठा नदी कोरडी, खडकवासला धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल चोरण्यासाठी पुण्यात आल्याची कबुली चोरट्यांनी दिली. चोरट्यांकडून ५२ मोबाइल संच जप्त करण्यात आले. चोरट्यांनी मध्यभागातील महात्मा फुले मंडई, येरवडा भाजी मंडई परिसरातून मोबाइल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा… ‘सायन्स काँग्रेस’मधून केंद्र सरकार बाहेर; पुढील वर्षी होणाऱ्या संमेलनाला सहकार्यास नकार 

हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे चोरट्यांनी केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang from jharkhand who stole mobile phones during ganeshotsav were arrested by hadpasar police 52 mobiles seized pune print news rbk 25 dvr

First published on: 27-09-2023 at 11:07 IST
Next Story
यंदा गणेश विसर्जनाला मुठा नदी कोरडी, खडकवासला धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय