scorecardresearch

पुणे: सिंहगड रस्ता परिसरात टोळक्याची दहशत; तरुणावर हल्ला; सात जण अटकेत

वैमनस्यातून टोळक्याने तरूणावर वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात घडली.

crime news
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

वैमनस्यातून टोळक्याने तरूणावर वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली.

हेही वाचा >>>पिंपरी: हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक; गुन्हा दाखल

नीरज काशीनाथ भडावळे (वय २१, रा. सद्गुरु पॅलेस, नऱ्हे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत शिवाजी शेंंडकर (वय २१, रा. हनुमाननगर, आंबेगाव बुद्रुक), अक्षय घोडके (वय २७, रा. नऱ्हे), संग्राम कुटे (वय २६) आणि यश बाळु म्हसवडे (वय २०, दोघेही रा. आगरवाल चाळ, कात्रज), समर्थ प्रकाश गुरव (वय २२, रा. नऱ्हे). प्रवीण अनंता येनपुरे (वय २८, आंबेगाव बुद्रुक), गणेश जाधव (वय १९, रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली. याबाबत नीरज भडावळेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींचा साथीदार विशाल उर्फ टिनू राजेंद्र साळी पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा >>>पुणे: एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या रस्त्यासाठी स्थानिक रहिवाशांची मुंबई उच्च न्यायालयात धाव !

नीरज आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या कारणावरुन आरोपींनी मध्यरात्री नीरजवर हल्ला केला. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या नीरजला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेेल्या सात आरोपींना पोलिसांनी शिंदेवाडी परिसरातून अटक केली, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजुरकर यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 18:13 IST