scorecardresearch

पुणे हादरलं! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

चाकूचा धाक दाखवत मुलीवर बलात्कार, सहाजण अटकेत

पुणे हादरलं! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यात १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवत मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीला चाकूचा धाक दाखवला आणि सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपींनी मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. तक्रार केल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी त्यांनी पीडितेला दिली होती. दरम्यान पीडितने आपल्या आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

मुंबई हादरली! लोअर परळमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमधील तिघे अल्पवयीन

पीडितेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या बलात्कारामुळे पुणे शहर मात्र हादरलं आहे.

२४ डिसेंबरला मुंबईतील लोअर परळ येथे १५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली होती. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील तीन मुलांना पोलिसांनी अटक केली असून ३ अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींपैकी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला असून उर्वरित आरोपींनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 11:34 IST

संबंधित बातम्या