पुणे : महिलांची छेड काढणाऱ्या गुंडाला पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. नवनाथ संभाजी गिरी (वय १९, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, एकता चौक, खराडी) असे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. गिरी याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात महिलांची छेड काढल्या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याने पुन्हा महिलांची छेड काढण्याचे गुन्हे केले होते. त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, प्रशांतका कापुरे, सागर कडू यांनी तयार केला. या प्रस्तावास पोलीस उपायुक्त बोराटे यांनी मंजुरी दिली. गिरी याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Over thousand children are reunited with their families in a year with help of Railway Security Force
ताटातूट झालेल्या मुलांना पुन्हा मिळालं घर! रेल्वे सुरक्षा दलामुळे वर्षभरात हजारहून अधिक मुलांची कुटुंबीयांशी पुनर्भेट
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव