scorecardresearch

Premium

पुणे: कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुंड अटकेत

फहीम फिरोज खान (१९, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

gangster terrorizing Koyta arrested pune
कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुंड अटकेत

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: हातामध्ये कोयता घेऊन मार्केटयार्ड भागात दहशत माजविणाऱ्या तडीपार सराईत गुंडाला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.

samosa seller woman molested kalyan
कल्याणमध्ये समोसा विक्रेत्या महिलेचा विनयभंग
Kidnapping youth putting chilli powder his eyes buldhana
बुलढाणा: डोळ्यात मिरची पूड टाकून युवकाचे अपहरण
Crime News
धक्कादायक! प्रियकराने दिला सेक्सला नकार, भडकलेल्या प्रेयसीने थेट प्रायव्हेट पार्टवरच केला वार
silk-smitha
सिल्क स्मिताने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा झालेला लिलाव; ‘एवढ्या’ किंमतीला विकलं गेलेलं फळ

फहीम फिरोज खान (१९, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मार्केटयार्ड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान आंबेडकर नगर भागात एकजण हवेत कोयता फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत फहीम याला ताब्यात घेतले.

हेही वाचा… वास्तुकला पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया रखडली

माझ्याविरोधात कोणी कोणी तक्रारी केल्या, त्यांना सोडणार नाही, असे खान ओरडत होता. पोलिसांना पाहताच तो पळून जावू लागला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच खान याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. त्यानंतर देखील तो शहरात येवून दहशत माजविताना मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंह गौड, गुन्हे निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gangster who was terrorizing with koyta arrested pune print news vvk 10 dvr

First published on: 03-08-2023 at 20:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×