पुणे : वारजे भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुंडाला एक वर्षांसाठी कोल्हापूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा <<< व्यावसायिकाला दोन महिलांकडून अडीच लाखाला गंडा

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हेही वाचा <<< पुणे : टोळक्यांचा दुकानदारावर हल्ला ; दुकानाची तोडफोड

महेश विजय वांजळे (वय २८, रा. न्यू अहिरे गाव, गणपती माथा, वारजे) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. वांजळे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, शस्त्र बाळगणे तसेच दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करत नव्हते. त्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली. गेल्या दीड वर्षात शहरातील ७७ गुंडांच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.