सिलेंडरमधील गॅस चोरून रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरल्यानंतर नागरिकांना बेकायदा सिलेंडर विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने पकडले. गुन्हे शाखेकडून गणेश पेठेत ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून चार सिलेंडर, चार प्लास्टिकच्या नळ्या, टेम्पो असा दोन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तुषार ज्ञानदेव चांदगुडे (वय २७, रा. सुपा, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चांदगुडे एका गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीत सिलेंडर वाहतुकीचे काम करत होता. चांदगुडे भरलेल्या सिलेंडरमधून नळीद्वारे गॅस चोरून तो रिकाम्या टाकीत भरायचा. चोरलेल्या गॅस सिलेंडरची विक्री तो नागरिकांना करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश पेठेतील दारुवाला पूल परिसरात कारवाई केली. गुरूद्वारा परिसरात पार्किंगच्या मोकळ्या जागेत तो नळीद्वारे सिलेंडरमधील गॅस चोरून तो रिकाम्या टाकीत भरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. चांदगुडेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालायने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, किशोर वग्गू, गजानन सोनुने, चेतन गोरे, साधना ताम्हाणे आदींनी ही कारवाई केली.