पुणे : निधनानंतर चोवीस तासांतच गिरीश बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू

Girish Bapat’s contact office opened खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाल्यानंतर चोवीस तासांतच त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.

girish bapat गिरीश बापट
गिरीश बापट (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पुणे : MP Girish Bapat Office Pune खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाल्यानंतर चोवीस तासांतच त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. तसेच बापट यांचे संपर्क कार्यालय या पुढेही सुरूच राहणार आहे. खासदार गिरीश बापट यांचे गुरुवारी निधन झाले. बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक पदापासून सुरुवात करून पुण्याचे खासदार होण्यापर्यंतचा राजकीय प्रवास केला.

पाचवेळा आमदार झालेल्या बापट यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदासह विविध मंत्रीपदेही भुषवली होती. सर्वसामान्यांमध्ये राहणारे नेते म्हणून बापट सुपरिचित होते. बापटयांच्या निधनानंतर लगेचच चोवीस तासांत त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. भाजपचे सहप्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर म्हणाले, की नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदार गिरीश बापट तत्परतेने कार्यरत होते. त्यामुळे बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या पुढेही हे कार्यालय सुरू राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 19:20 IST
Next Story
पुणे : रिझर्व्ह बँकेकडून सहा सहकारी बँकांवर कारवाई 
Exit mobile version