पुण्यातील कामासाठी अधिकारवाणीने कोणाला हाक मारायची?, नारायण राणे यांची भावना; बापट कुटुंबीयांची घेतली भेट

गिरीश बापट यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांचे मला कामात, कारभारात नेहमीच सहकार्य लाभले. बापट म्हणजे पुणे असे एक समीकरण होते.

Narayan Rane Visited Bapat family
खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांत्वनपर भेट घेतली

पुणे : गिरीश बापट यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांचे मला कामात, कारभारात नेहमीच सहकार्य लाभले. बापट म्हणजे पुणे असे एक समीकरण होते. कोणतेही काम असल्यास अधिकारवाणीने बापट यांना सांगायचो, आता मात्र कोणाला हाक मारावी असा प्रश्न आहे, अशा भावना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी व्यक्त केल्या.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

खासदार बापट यांचे बुधवारी निधन झाले. या पार्श्वभूमीवर बापट कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि केंद्रीय मंत्री राणे बापट यांच्या निवासस्थानी आले होते. पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, की सन १९९५ मध्ये बापट पहिल्यांदा आमदार म्हणून सभागृहात आले. त्यावेळी मी देखील आमदार होतो. भाजप आणि शिवसेना युती असल्याने दोन्ही पक्षांचे आम्ही नेते एकत्र काम करायचो. विधिमंडळाच्या कामकाजात बापट यांना रस घ्यायचे, कार्यरत होते. अभ्यासू व्यक्तीमत्व, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे अशीच त्यांची ओळख होती. भाजपचे पुण्यातील काम अतिशय चांगले होते. लोक त्यांना आादर्श लोकप्रतिनिधी म्हणून पाहायचे. विश्वासाने आपले काम घेऊन लोक त्यांच्याकडे जायचे आणि लोकांची कामे बापट आनंदाने करायचे. ते असे एकाएकी जातील असे वाटले नव्हते. आजारातून बरे होतील, याची आम्ही वाट पाहात होतो. बापट यांच्या गिरीशभाऊ जाण्याने पुण्याच्या राजकारणात आणि भाजपात एक पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> पुणे : निधनानंतर चोवीस तासांतच गिरीश बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू

बापटांच्या मदतीचा मी देखील अनुभव घेतला..

बापट यांना ह्रदयविकाराच्या उपचारांकरिता पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाच मला नातू झाला होता, म्हणून मी देखील त्याचा रुग्णालयात होतो. सकाळी मला जेव्हा बापट यांना दाखल करण्यात आल्याचे समजले तेव्हा त्यांची भेट घेतली होती. आजारपणातही त्यांचा मिश्किल, दिलदार स्वभाव कायम होता. कायम भेटल्यानंतर विचारपूस करायचे. दुसऱ्यांना मदत करण्याचा मी स्वत:ही अनुभव घेतला आहे, अशी आठवण केंद्रीय मंत्री राणे यांनी या वेळी सांगितली.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 19:40 IST
Next Story
पुणे : निधनानंतर चोवीस तासांतच गिरीश बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू
Exit mobile version