scorecardresearch

‘कोश्यारी’ असेपर्यंत विधान परिषद नाही! ; ‘पुणे हॅशटॅग’च्या प्रकाशन सोहळय़ात गिरीश बापट यांची कोपरखळी

अंकुश काकडे आणि मी, आम्ही दोघांनीही आपापल्या पक्षाचे काम एकनिष्ठपणे करून मैत्री जपली. माझी गाडी पोहोचली आहे.

पुणे : जुन्या पुण्यातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील खुमासदार किस्से, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांनी  भाषणातून एकमेकांना मारलेल्या कोपरखळय़ांनी हास्यकल्लोळात बुडालेले श्रोते अशा वातावरणात ‘पुणे हॅशटॅग’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले.

अंकुश काकडे आणि मी, आम्ही दोघांनीही आपापल्या पक्षाचे काम एकनिष्ठपणे करून मैत्री जपली. माझी गाडी पोहोचली आहे. अंकुश काकडे यांचे भवितव्य आता शरद पवार यांच्या हाती आहे. त्यांचे काय करायचे हे पवारच ठरवतील. मात्र, त्यांना विधान परिषदेवर घ्यायचा विचार असेल, तर ‘कोश्यारी’ असेपर्यंत परिषदही मिळणार नाही, अशी कोपरखळी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मारली.

त्यामुळे सभागृहात हशा पिकला आणि पवार यांनाही हसू आवरले नाही.उत्कर्ष प्रकाशनतर्फे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते. मात्र, त्याचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. पक्षीय निष्ठा कायम राखत सर्व राजकीय पक्षातील व्यक्तींशी सौहार्दता जपणे ही आपली राजकीय संस्कृती आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girish bapat in hashtag pune book release ceremony zws

ताज्या बातम्या