पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बोपखेलमध्ये बुधवारी दुपारी लहान मुलं खेळत असताना घडली आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर दिघीतील गणेश नगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गिरिजा गणेश शिंदे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. हेही वाचा - पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा तिढा कायम हेही वाचा - उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात आगपाखड दिसून येते : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बोपखेलमध्ये बुधवारी दुपारी लहान मुलं खेळत असताना घडली आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. pic.twitter.com/2872W8v8jm— LoksattaLive (@LoksattaLive) August 1, 2024 बुधवारी दुपारी गणेश नगरमध्ये चार मुलं खेळत होती. त्यापैकी दोघेजण लोखंडी गेटच्या आत गेले, त्यानंतर गिरिजा आणि तिची दुसरी सहकारी ठीक गेटच्या समोर आली. तेव्हा दुसरा मुलगा गेट ओढत असताना ते शेकडो किलोचे गेट चिमुकलीच्या अंगावर पडलं. गेट खाली दबल्या गेल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेट नादुरुस्त असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आणि बिल्डिंगच्या मालकाला माहीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.