रिक्षा चालकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पसार झालेल्या रिक्षा चालकाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पीडित युवतीने बंडगार्डन पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे. युवती बंडगार्डन भागातून रिक्षाने निघाली होती. रिक्षा चालकाने अश्लील वर्तन केले आणि युवतीला स्पर्श केला. त्यानंतर निर्जन रस्त्यावर रिक्षा नेली.

युवतीने विरोध केल्यानंतर रिक्षा चालकाने तिच्या हाताला सिगारेटचा चटका दिला. तिला फर्ग्युसन रस्त्यावर सोडून रिक्षा चालक पसार झाला.
सहायक पोलिस निरीक्षक सपकाळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.