scorecardresearch

Premium

पिंपरी: निगडीत मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार; आरोपी अटकेत

मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

68 year man Arrested for sexual assault
दिल्लीत धक्कादायक प्रकार उघड (प्रातिनिधीक फोटो)

पिंपरी : मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडली.

या प्रकरणी तरुणीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक नानाभाऊ होरे (वय ३५) याला अटक केली आहे. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा >>>ऐन दिवाळीत रेल्वे प्रवासी वाऱ्यावर? पुणे स्थानक रोज दोन ते चार तास बंद राहण्याची शक्यता

फिर्यादी यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून, ती मनोरुग्ण असल्याचे माहिती असूनदेखील आरोपी माणिक याने तिच्याशी जवळीक साधली. गोड बोलून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. फिर्यादी व त्यांच्या पतीने याबाबत आरोपीला फोन करून जाब विचारला. तू आमचा विश्वासघात केला आहे, असे म्हटले असता. आरोपीने त्यांना शिवीगाळ करत त्यांचा मुलगा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला त्याच्या पत्नीने साथ दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl raped by taking advantage of mental illness in pimpri pune print news ggy 03 amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×