पुणे : मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाउनमधे मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. गोडाऊनमधे कागद रद्दी आणि भंगार माल होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने गोडाउनच्या मुख्य दरवाजाचे कटरने कुलूप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अडकला नाही ना, याची ही खात्री केली. आग मोठी असल्याने जवानांनी अतिरिक्त अग्निशमन वाहनांना पाचारण केले. शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग पसरु नये याची काळजी घेण्यात आली. पाण्याचा मारा सुरू करून तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी गोडाउनमधे असलेले रद्दीचे कागद पूर्णपणे जळाले. गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो जळाले. नुकसान आणि आगीचे कारण समजू शकले नाही. कोणी जखमी झाले नाही. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे आणि जवानांनी आग आटोक्यात आणली.



