ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

पुणे : शेती, सहकार, ग्रामीण विकास या विषयांना नवसंजीवनी देण्याबरोबरच गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या अभ्यासक्रमात विदा विश्लेषण, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाणार आहे. आठ वर्षांनी शताब्दी साजरी करणाऱ्या संस्थेला नवी झळाळी प्राप्त करून देण्यात येणार असून संस्थेतील मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

अभिमत विद्यापीठाचा दर्जा असलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या भविष्यवेधी आराखडा समितीची शनिवारी समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पहिली बैठक झाली. बैठकीमध्ये संस्थेचे कुलगुरू प्रा. अजित रानडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.या बैठकीनंतर डॉ. जाधव यांनी ही माहिती दिली.