पिंपरी-चिंचवडमध्ये सोनसाखळी चोरट्याने पोलिसांच्या डोळ्यांवर स्प्रे मारून पळून, जाण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना निगडी प्राधिकरण परिसरात घडली आहे. यात पोलीस कर्मचारी सतीश ढोलेसह पोलीस मित्र जखमी झाले आहेत. मात्र जखमी अवस्थेतही पोलीस कर्मचारी सतीश ढोले यांनी चोरट्यास पकडून ठेवल्याने, अखेर या अट्टल चोरास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. राजू खेमु राठोड असे सोनसाखळी चोरट्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर एकूण ५० गुन्हे दाखल असल्याची निगडी पोलिसांनी माहिती दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथे उच्चभ्रू सोसायट्या आहेत. त्यामुळे त्या परिसरात सकाळी फिरायला जाण्याच प्रमाण देखील जास्त आहे. याचा फायदा सोनसाखळी चोरटे घ्यायचे. परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना देखील वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सतीश ढोले हे पहाटेच्या सुमारास गस्त घालत होते. तेव्हा, आरोपी राजू हा संशयास्पद दिसला, त्याला थांबविण्याचा सतीश ढोले यांनी प्रयत्न केला, मात्र तो पळून जात असताना त्याच्या दुचाकीला ढोले यांनी चारचाकी आडवी लावली. त्यानंतर गाडीतून उतरून राजूला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता, दोघांमध्ये झटापट झाली.

Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

दरम्यान पोलीस कर्मचारी ढोले यांनी याची माहिती इतर सहकाऱ्यांना दिली होती. तेवढ्यात पोलीस मित्र हगवणे तिथे आले, तिघांमध्ये झटापट सुरू होती. राजुने आपल्या जवळील चाकूने त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला, त्यामुळे त्याच्या जवळील सेल्फ डिफेन्सचा स्प्रे काढून तो त्याने पोलीस कर्मचारी सतीश ढोले आणि पोलीस मित्राच्या तोंडावर मारला. यात, दोघे जखमी झाले. मात्र, ढोले यांनी आरोपीला सोडले नाही, त्याला धरून ठवले. तोपर्यंत दुसरे पोलीस कर्मचारी आले त्यांनी आरोपी राजूला ताब्यात घेतलं आहे. आरोपी राजूवर एकूण ५० गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं असून तो सराईत चोरटा आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.