सोन्याच्या तस्करीसाठी तस्करांकडून अनेक प्रकारच्या शक्कल लढवल्या जातात. अमली पदार्थ आणि सोन्याची तस्करी करणाऱ्यांना काही पैसे अदा करून त्यांच्याकडून देशातील विमानतळांवर माल उतरवला जातो. तस्करी करून आणलेले सोने शक्यतो मोठय़ा विमानतळावर उतरवले जात नाही. त्यामुळे सोनेतस्कर पुणे, कोचीन, बंगळुरू या विमानतळांना तस्करीसाठी पसंती देतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा विमानतळांवर सीमाशुल्क विभागाची नजर असते. तेथे पकडले जाण्याची भीती अधिक असते. अंतर्वस्त्र, प्रसाधनगृह, खाद्यपदार्थाचे हवाबंद डबे किंवा थर्मासमध्ये दडवून सोने आणले जाते. तस्कर त्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळी शक्कल लढवत असतात.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करताना मुंबईतील दोन महिलांना पकडण्यात आले होते. तसेच थर्मासमध्ये आतील बाजूला सोन्याचा मुलामा देऊन त्या माध्यमातून तस्करी करण्याचा प्रकारही पुणे विमानतळावर उघडकीस आला होता. आखाती देशातून भारताक डे येणाऱ्या भारतीय विमान कंपनीच्या विमानाला तस्कर प्राधान्य देतात. विमानाच्या प्रसाधनगृहात सोने दडवून आणले जाते.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

आखाती देशातून पुण्यात आलेल्या विमानाचा वापर लगेचच देशाअंतर्गत वाहतुकीसाठी केला जातो. प्रसाधनगृहात सोने दडवून आणणारा तस्कर पुण्यातील विमानतळावर उतरतो. सीमाशुल्क विभागाकडून आंतरराष्ट्रीय विमानाची तसेच प्रवाशांची तपासणी केली जाते. विमान तपासणीत काही आढळून आले नाही तर ते विमान देशातील दुसऱ्या शहराकडे रवाना होते.

लगोलग तस्कराचा साथीदार देशांतर्गत विमानप्रवासाचे तिकीट काढतो. आखाती देशातून पुण्यात उतरलेले विमान कुठल्या शहराकडे निघाले आहे, याची माहिती घेऊन तस्कराचा साथीदार त्या विमानाने रवाना होतो.

हे विमान दुसऱ्या शहरात उतरल्यानंतर विमान किंवा प्रवाशांची तपासणी केली जात नाही. त्यातही शक्यतो देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशाची तपासणी केली जात नाही. तस्कराचा साथीदार हे सोने प्रवासादरम्यान काढून घेतो. दुसऱ्या शहरात उतरण्यापूर्वी सोने बॅगेत किंवा कपडय़ांमध्ये दडवून तस्कर सोने विमानतळाबाहेर नेतो. काही घटनांमध्ये विमानतळावरील सफाई कर्मचारी तस्करांशी संगमनत करून सोने विमानतळाबाहेर आणतात.

सोने तस्करीचा असा आहे धंदा..

  • बेकायदेशीर तस्करीमुळे सरकारला अब्जावधी रुपयांचा तोटा
  • शक्यतो छोटय़ा विमानतळांचा तस्करीसाठी वापर
  • तस्करीतून आणलेल्या एक किलो सोन्यामागे तीन लाखांचा नफा
  • तस्करीचे सोने गाळून सराफांना विक्री
  • आयात शुल्कामुळे सोने महाग, त्यामुळे तस्करीचे सोने घेण्याकडे ओढा
  • तस्करीसाठी खास माणसे, महिलांचा वापर
  • आखाती देशातून सर्वाधिक तस्करी

 

सर्वाधिक तस्करी सोन्याची ; अमली पदार्थाचीही तस्करी जोरात

पुणे : भारतात सोन्याला मोठी मागणी आहे. सोने खरेदीकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. सामान्यांपासून धनाढय़ व्यक्तीपर्यंत बहुतेक सर्व जण सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्याविषयीचे आकर्षण कायम आहे. परिणामी सोन्यात गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर होते आणि त्याला मागणीही मोठी राहते. सोन्यापाठोपाठ मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थाची तस्करी भारतात केली जाते.

काही वर्षांपूर्वी सोन्याची तस्करी समुद्रातून व्हायची. कोकण किनारपट्टी ते गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीवरून सोन्याच्या तस्करीचे जाळे तस्करांनी निर्माण केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून किनारपट्टीवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ झाली तसेच किनारपट्टीच्या भागातील नागरिक सतर्क झाल्याने सोन्याची तस्करी जवळपास थांबली आहे. जलमार्ग खडतर मानला गेल्याने तस्करांनी विमानाने सोन्याची तस्करी करण्यास प्राधान्य दिले आहे. सोन्यापाठोपाठ देशात अमली पदार्थाची तस्करी होते. तस्करी करणाऱ्या व्यक्तीला कॅरिअर किंवा पोपट असा सांकेतिक शब्द वापरला जातो. त्यांना एक किलो सोने आणण्यासाठी दहा ते पंचवीस हजार रुपये दिले जातात. आखाती देशाचे एक ते दोन दिवस पर्यटन असा हेतू ठेवून अनेकजण नकळत तस्करांच्या जाळ्यात ओढले जातात, अशी माहिती सीमाशुल्क विभागातील (कस्टम) सूत्रांनी दिली.