पिंपरी : महापालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (ग्रॅप’) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पामध्ये शहराची हवेची गुणवत्ता पद्धतशीरपणे सुधारली आहे, याची खात्री करण्यासाठी वास्तविक वेळेमध्ये निरिक्षण प्रणाली, अत्याधुनिक अंदाज आणि तात्काळ अंमलबजावणीचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रॅप उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून महापालिकेने हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्वाचे धोरण तयार केले आहे. या अंतर्गत अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद केले जाणार आहेत.

 महापालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामच्या अंतर्गत हद्दीमध्ये हवा शुद्धीकरण प्रणाली, धुके घालविणारी उपकरणे, रस्ता साफसफाई करणारी उपकरणे (रोड वॉशर) आणि पिचकारी आधारित पाण्याचे फवारे असणारी प्रणाली अशा विविध बाबींच्या माध्यमातून हवा प्रदुषित होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रॅप प्रणालीच्या दोन, तीन व चार या टप्प्यांतर्गत सुधारित हवेच्या गुणवत्तेचा अंदाज हे सी-डॅकच्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’ नुसार हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजांवर तीन दिवस अगोदर सुरू केले जातील. सुचविण्यात आलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांक  मध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत लागू करण्यात येतील. महापालिका सी-डॅकच्या अंदाजानुसार, शहराच्या सर्व भागामधील   पीएम २.५, पीएम १०, एनओ एक्स, एसओ एक्स सारख्या प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagpur, Survey , HMPV Nagpur,
नागपूर : एचएमपीव्ही संशयित आढळताच सर्वेक्षण, महापालिकेने उचलली ‘ही’ पावले
air pollution mumbai Constructions
बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त, गोवंडी शिवाजीनगर निरीक्षणाखाली; वायू प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर नजर
Shivaji Park ground, dust , Maharashtra Pollution Control Board, municipal corporation,
१५ दिवसांत पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धूळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षाचे आदेश
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
Health , Mumbai Municipal Corporation ,
प्रदूषण काळात व्यायाम टाळावा, मुंबई महापालिकेचा नागरिकांसाठी आरोग्य सल्ला
air quality in some parts of mumbai satisfactory
मुंबईमधील काही भागातील हवाच ‘समाधानकारक’; घाटकोपरमधील हवा ‘वाईट’

हेही वाचा >>>Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

 वाहनांच्या प्रदूषणाची कठोर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा निर्माण केली आहे. यामध्ये एनपीआर कॅमेरे आणि प्रत्यक्षरित्या कामावर असणारे कर्मचारी हे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आणि वाहतूक पोलिस यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे एकात्मिक प्रणालीद्वारे उत्सर्जन नियंत्रण अनुपालन  ट्रॅक करतील. औद्योगिक आणि बांधकाम प्रदूषणावर एक पाळत ठेवणारी एजन्सी नेमण्यात आली आहे. यामध्ये ३२ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह आठ वॉर्डांमध्ये, उल्लंघनाच्या  निरीक्षणासाठी तैनात करण्यात आली आहे.

 चार टप्प्यांचा कृती आराखडा

शहरातील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीनुसार त्यावर उपाय करण्यात येणार आहेत. यामध्ये उपाययोजनांसाठी हवा गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेऊन त्याआधारे चार टप्पे करण्यात आले आहेत. रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार यांचा समावेश आहे. अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद करण्यात येणार, वाहनांच्या प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन उल्लंघनावर कठोर दंड आकारण्यात येणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू करण्यात येणार आहेत. प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून रात्रं-दिवस गस्त घातली जाणार आहे.

हेही वाचा >>>Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा

 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 प्रदुषणाबाबत पाळत व दक्षता ठेवण्यासाठी, विविध प्रकारच्या कचरा – संबंधित व पर्यावरणीय उल्लंघनांवर नियंत्रण व गस्त घालण्यासाठी एक समर्पित एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ प्रोजेक्ट मॅनेजर, ४ पर्यवेक्षक, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ३२ जणांचा प्रत्यक्ष जागेवरील कर्मचाऱ्यांचा व ३९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नेमण्यात आलेल्या एजन्सीद्वारे स्वच्छ इंधन वाहनांचा वापर करून कर्मचाऱ्यांकडून शहरामध्ये रात्र-दिवस गस्त घालण्यात येईल.

ग्रॅप प्रकल्पाचे फायदे

ग्रॅपच्या माध्यमातून हवा गुणवत्ता निर्देशांकांच्या अंदाजांवर आगाऊ उपायांवर शोधले जाऊन प्रदूषणाची जोखीम प्रभावीपणे कमी करण्यास मदत होते. हे वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांवर म्हणजेच मध्यम ते गंभीर अशा टप्प्याटप्प्याने प्रतिसाद योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येते. ग्रॅपनुसार थेट प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर उपयायोजना केल्याने खराब हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आरोग्य धोके कमी करण्यात मदत होते.

नागरिकांचा सहभाग व हवेच्या गुणवत्तेसाठी विविध आधारावर विविध घटकांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी केल्याने नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

 ‘ग्रॅप’ शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेतील एक मैलाचा दगड

  शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी ग्रॅप सारखा उपक्रम सुरु करणे म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेमधील एक मैलाचा दगड आहे. प्रगत तंत्रज्ञान, वास्तविक देखरेख आणि नागरिकांचा सहभागासह आम्ही शाश्वत विकासाला चालना देत आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे ध्येय ठेवले आहे. हा पद्धतशीरपणे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Story img Loader