पुणे: विद्यापीठांतील पदवी प्रदान समारंभ आता बंद; चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी प्रदान समारंभ बंद केले जाणार आहेत. पुढील काही दिवसांत त्याबाबत सूचना दिली जाईल.

chandrakant-patil
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (संग्रहित छायाचित्र)

डिजिलॉकरद्वारे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध

राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी प्रदान समारंभ बंद केले जाणार आहेत. पुढील काही दिवसांत त्याबाबत सूचना दिली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र थेट डिजीलॉकरमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

उच्च व तंत्र शिक्षणातील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अशा विषयांबाबत पाटील यांनी माहिती दिली. सध्याच्या काळात काळा झगा आणि मोठ्या टोप्या घालून भव्य पदवी प्रदान समारंभ साजरे करण्याची गरज नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्रे कुठेही आणि कधीही उपलब्ध करून घेऊ शकतात. याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: गिरीश बापट यांची पोकळी भरून काढणारा नेता आज भाजपकडे नाही

करोना काळातील आर्थिक अडचणींमुळे शुल्क प्रतिपूर्तीवर परिणाम झाला. मात्र प्रलंबित शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शिक्षण संस्थांना देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्तीबाबत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

खासगी विद्यापीठांमध्ये दहा टक्के जागा राखीव

खासगी विद्यापीठांमध्ये दहा टक्के जागा राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. या जागांवरील प्रवेश स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेद्वारे होईल. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया होईल. या विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क शासनाकडून भरले जाईल. तर ५० टक्के शुल्क विद्यापीठे भरतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण घेता येईल. या संदर्भात खासगी विद्यापीठांच्या प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक झाली आहे. त्या संदर्भातील नियमावली लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 19:30 IST
Next Story
पुणे: हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा पोलिसांना विसर; जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात घट
Exit mobile version