scorecardresearch

ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला बेदम मारहाण

रस्ते दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उरळी कांचन ग्रामपंचायतीतील सदस्याच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

man-arrested-1
(प्रातिनिधिक छायाचित्र)

उरळी कांचनमधील घटना; दोघे अटकेत
रस्ते दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उरळी कांचन ग्रामपंचायतीतील सदस्याच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.

अभिजीत नरेंद्र काटे (वय ३३) आणि अजिंक्य नरेंद्र काटे (वय ३७, दोघे रा. तुपे वस्ती, उरळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मारहाणीत भाऊसाहेब तुपे (वय ५६ ) जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाऊसाहेब यांची पत्नी ग्रामपंचायतीत सदस्य आहे. उरळी कांचनमधील वॅा र्ड क्रमांक पाचमध्ये रस्त्याचे काम करण्यात येत होते. कामाची पाहणी करण्यासाठी तुपे गेले होते. त्या वेळी काटे यांनी तुपे यांच्याशी वाद घातला. त्यांना बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gram panchayat member husband beaten death incidents urli kanchan arrested print news amy

ताज्या बातम्या