पडद्यामागील कलाकारांप्रती कृतज्ञता

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे सलग दुसऱ्या वर्षी तन्वीर पुरस्काराची रक्कम रंगभूमी क्षेत्रातील पडद्यामागच्या कलाकारांना सुपूर्द करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे तन्वीर पुरस्काराची रक्कम रंगभूमी क्षेत्रातील पडद्यामागच्या कलाकारांना सुपूर्द करण्यात आली.

‘रूपवेध प्रतिष्ठान’तर्फे तन्वीर पुरस्काराची रक्कम सुपूर्द    

पुणे : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे सलग दुसऱ्या वर्षी तन्वीर पुरस्काराची रक्कम रंगभूमी क्षेत्रातील पडद्यामागच्या कलाकारांना सुपूर्द करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानच्यावतीने रंगभूमीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेते/ अभिनेत्री यांना २००४ ते २०१९ अशी  पंधरा वर्षे तन्वीर सन्मान आणि तन्वीर रंगधर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आले.  इब्राहिम अल्काझी, विजय तेंडुलकर, विजया मेहता, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह असे  दिग्गज रंगकर्मी तन्वीर सन्मानाचे तर युवा पिढीतील चेतन दातार, गजानन परांजपे, वीणा जामकर, धर्मकीर्ती सुमंत असे रंगकर्मी तन्वीर रंगधर्मी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. श्रीराम लागू व दीपा लागू यांचा मुलगा तन्वीर याच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ९ डिसेंबर रोजी हे सन्मान दिले गेले.

दोन वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. त्यानंतर करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी ते पुरस्कार दिले गेले नाहीत आणि कार्यक्रमही झाला नाही. मात्र त्या दोन्ही पुरस्कारांची रक्कम आणि कार्यक्रमाचा होऊ शकला असता तो  खर्च, अशी दोन लाख रुपये रक्कम रंगभूमीवर पडद्यामागे काम करणाऱ्या दहा कलाकारांना  दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. डॉ. श्रीराम लागू यांच्या जन्मदिनाचे  औचित्य साधून गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी ही दिवाळी भेट देण्यात आली होती. या वर्षीही पुरस्कार जाहीर न करता दोन लाख रुपये रंगमंच व्यवस्था, प्रकाश योजना, संगीत योजना, तिकीट विक्री करणारे आणि भोजन व्यवस्था पाहणारे ही कामे करणाऱ्या दहा व्यक्तींना देण्यात आली.  दीपा लागू यांच्या घरी अनौपचारिक कार्यक्रमात हे धनादेश समीर हंपी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gratitude artist behind scenes ysh

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या