लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीमधील सेवा उदवाहनाचा (लिफ्ट) वापर करण्यास सांगितल्याने डिलिव्हरी बॉयने २०-२५ साथीदारांना घेऊन येत सोसायटीमध्ये राडा घातला. सुरक्षारक्षकासह चौघांवर दांडके, दगडाने मारहाण केल्याची घटना पुनावळेतील पुना व्हिले सोसायटीत घडली.

young man killed due to argument happen during joking an incident in Uttamnagar area
चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून तरुणाचा खून, उत्तमनगर भागातील घटना
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Crime against office bearers of society in Aundh for excommunicating a computer engineer
संगणक अभियंत्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी औंधमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

सुरक्षारक्षक मोहम्मद अश्रफ मोहम्मद शफी (वय २७, रा. पुनावळे, मूळ जम्मू-काश्मीर), पर्यवेक्षक प्रभाकर पांडे, ज्ञानदेव भोगील, मेहबूब शेख अशी जखमींची नावे आहेत. शफी यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारुती परसराम वराडे (वय २०, रा. जांबे, ता. मुळशी), केदार जितेश बनसोडे (वय १९, रा. वाकड), गोपाल सिद्धेश्वर बोरावडे (वय २६, रा. पुनावळे), प्रियंकसिंग सुरेंद्रसिंग तोमर (वय २३, रा. हिंजवडी), रजाक इर्शाद खान (वय २५, रा. देहूरोड), सुनील विठ्ठल गवळी (वय २०, रा. जांबे, ता. मुळशी), सुनील सिद्धू बोधणे (वय २०, रा. मामुर्डी, ता. मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. राहुल गोपाळ बोरावडे आणि इतर १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून तरुणाचा खून, उत्तमनगर भागातील घटना

वराडे हा झेप्टो कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो पुनावळेतील पुना व्हिले सोसायटीत पार्सल देण्यासाठी आला. त्यावेळी तिथे नेमणुकीस असलेले सुरक्षारक्षक शफी यांनी त्यास प्रवासी उदवाहनाचा वापर न करता सेवा उदवाहनाचा वापर करण्यास सांगितले. या कारणावरून वराडेने चिडून त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. ‘आज याला संपवूनच टाकतो’, असे म्हणून दोघांनी शफी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर पाच ते सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी पांडे, भोगील, शेख आले असता त्यांना देखील १५ ते २० जणांनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फौजदार राहुल खिळे तपास करीत आहेत.